अकोट रोडवर रेल्वे गेट जवळ भुयारी मार्ग बनविण्यात यावा या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले.

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहरातील एकूण लोकसंख्या पैकी 30 टक्के लोकसंख्या राहत असलेल्या रेल्वे गेट पलीकडच्या धनगर फाईल सरकारी फाईल धनोकार नगर बुरुंगले हायस्कूल इत्यादी भागातील रहिवाशांना शेगाव शहरात येण्या-जाण्यासाठी भुयारी मार्ग बनविण्यात यावा

अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील नागरिकाकडून सातत्याने करण्यात येत आहे. शेगाव विकास आराखडा अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आलेली आहे त्याच कामांमध्ये समाविष्ट असलेल्या उड्डाणपुलाचे सुद्धा काम करण्यात आलेले आहे

मात्र रेल्वे गेटपली कडे राहणाऱ्या नागरिकांना गावामध्ये येण्या जाण्यासाठी अतिशय त्रास सहन करून उड्डाण पुलावरून ये जा करावी लागते त्यामुळे वयोवृद्ध लहान बालक किंवा आजारी रुग्णांना शेगाव शहरात येण्या जाण्याकरिता अडचण निर्माण झालेली आहे याबाबत वारंवार लोकप्रतिनिधींना सांगूनही त्यांच्याकडून केवळ आश्वासना पलीकडे कोणतीच कारवाई होत

नसल्याने त्रस्त झालेल्या रेल्वे गेट पलीकडे रहिवाशांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे

या मागणी करिता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज 25 मे रोजी एक दिवसीय घंटानात आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले, माजी नगरसेवक व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी माजी नगरसेवक अरुण भाऊ चांडक यांच्यासह शेकडो नागरिकांनी आंदोलनामध्ये सहभाग घेऊन घटना आंदोलन केले

Leave a Comment