Home अकोला अकोला जिल्ह्यात आज पत्रकारांचे एसएमएस पाठवा आंदोलन

अकोला जिल्ह्यात आज पत्रकारांचे एसएमएस पाठवा आंदोलन

311
0

 

अकोला – कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटूंबियांना शासनाने 50 लाख रुपयांची मदत करावी, कोरोना काळात विमा संरक्षण द्यावे, दिवंगत पत्रकार संतोष पवार व पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूची चोकशी करावी,कोविड हॉस्पिटलमध्ये पत्रकारांसाठी बेड राखीव ठेवण्यात यावेया प्रमुख चार मागण्यासाठी आज अकोला जिल्हा व सर्व तालुका संघातर्फे आरोग्य मंत्र्यांना एसएमएस पाठवा आंदोलन करण्यात येत आहे.मराठी पत्रकार परिषदेचे नेते श्री एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी संपूर्ण राज्यभर दिनांक 18 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी एसएमएस पाठवा या आंदोलनाची हाक दिली आहे.अकोला जिल्हा पत्रकार संघातर्फे हे आंदोलन अकोला, पातूर, बाळापूर, तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर , बार्शीटाकळी अशा सात तालुक्यातून राबविण्यात येणार आहे, उपरोक्त मागणीचे एसएमएस आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे याना त्यांच्या 9619111777 या भ्रमणध्वनीवर पाठवावेत असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शोकतली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, उपाध्यक्ष रामदास वानखेडे, गजानन सोमाणी,चिटणीस संजय खांडेकर,विजय शिंदे , सत्यशील सावरकर,प्रदीप काळपांडे , उमेश देशमुख,तालुका अध्यक्ष सर्वश्री मोहन जोशी,दिलीप देशमुख,अनिल गीऱ्हे,अरिओम व्यास, प्रल्हादराव ठोकणे, केशव लुले, दीपक देशपांडे यांनी केले आहे.एसएमएस पाठवा आंदोलना नंतर जिल्हा व तालुका पत्रकार संघाचे वतीने जिल्हाधिकारी व सर्व तालुका तहसीलदार यांना ई मेल द्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे.

Previous articleरात्री पायी फिरत असतांना समोरून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी
Next articleअंखड हिंदुस्थान चे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष पंतप्रधान, आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here