प्रतिनिधी अकोला अशोक भाकरे
काही दिवसापूर्वी महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात येत आहे
शनिवारी सकाळी मार्ग असलेल्या गांधी रोडवरील अतिक्रमण मोहिमेद्वारे दरम्यान मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक व्यावसायिक यांच्या झटापट झाली.
मनपाच्या पथकाने रस्त्यावरील साहित्य जप्त केले व्यापाऱ्यांनी विरोध केला त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता मात्र नंतर ही परिस्थिती निवळली शहरातील मुख्य मार्गावर व मुख्य मार्गावर रस्त्यालगत अनेक ठिकाणी दुकाने थाटाण्यात येतात रस्त्यावरच हातगाड्यावर विविध साहित्याची विक्री होते परिणामी वाहतुकीची नेहमीच कोंडी होते.
त्यामुळे काही दिवसापासून मनपाने अतिक्रमण हटवा मोहीम तीव्र केली आहे दरम्यान दहा डिसेंबर रोजी सकाळी मनपा ने गांधी रोड पासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला प्रारंभ केला आहे ही मोहीम मनपासमोरची वाणिज्यिक संकुल गांधी चौक गांधी रोड महाराणा प्रताप चौक व सिटी कोतवाली या मार्गाने राबविण्यात येत आहे