अडगांव बु :प्रतिनिधी दिपक रेळे
कोरोनामुळे यावर्षी सर्वांनी धार्मिक भावना जपून नवदुर्गा उत्सव व दसरा उत्सव साजरा करावा , असे मत गुरुवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार लव्हांगळे यांनी व्यक्त केले . यावर्षी देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीवर बंदी असून , शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील . यात मर्यादित स्वरुपाचा मंडप , चार फूट उंचीची मूर्ती , गरबा , दांडीया वा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम जसे माझे
कुटुंब माझी जबाबदारी , या मोहिमेबद्दल जनजागृती , रक्तदान , रोगनिदान शिबिर व ग्राम स्वच्छता अभियानासारख्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात यावे , असेही ठाणेदारांनी सांगितले . स्थानिक बालाजी मंगल कार्यालयात सोसायटी अध्यक्ष मनोहरलाल फाफट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात डॉ . नबी , अशोक घाटे, गजानन मुंगसे , पुंजाजी मानकर , महेबूबखा पठाण , मंगलसिंग डाबेराव , श्रीकृष्ण निमकर्डे , अफरोजखा , प्रल्हाद भोपळे , पुरुषोत्तम निमकर्डे , दीपक रेळे , संजय भटकर , पोलीस जमादार अनंत मुळे , विनोद इंगळे उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन पोका गवई यांनी तर आभार पोलीस पाटील हितेश हागे यांनी मानले .