अतिवृष्टीमुळे घराच्या छतासहित भिंत पडली.

 

हिंगणघाट दि.२२ डॉ.स्थानिक मुजुमदार वार्ड येथील रहिवासी श्रीमती सुनिता गोपाल मेश्राम यांचे राहते घर
सततधार पावसामुळे कोसळले.
अतिवृष्टीमुळे घरावरील छत व भिंत पडली असून त्यामुळे घरातील अन्नधान्य व इतर साहित्याच मोठे नुकसान झाले.
शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या कुटुंबियांचे घरकुल मंजूर असून दोन वर्षापासून त्यांना या योजनेचा फायदा अजूनही मिळाला नाही.
शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजु आहेत, त्यांना आजही घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही .
त्यामुळे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाकडून यांची दखल घेऊन यांना त्वरित घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच अतिवृष्टिमुळे झालेल्या हानीची नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment