अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामूळे सौंदड-चारगाव-परसोडी रस्त्याची दुरावस्था

 

शैलेस राजनकर गोंदिया

तालुक्यातील सौंदड-परसोडी जाणा-या रस्त्यावर अनेक ठिकाणी १ ते ३ मी.चे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दुरावस्था आहे.खड्यात पाणी साचल्याने रस्ता जलमय झालेला असून या रस्त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सौंदड वरून परसोडीला जाणारा रस्ता हा जिल्हा मार्ग असुन सौंदड बाजार बोडी पासून भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या एक किमी.रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेत.तीच अवस्था भंडारा जिल्ह्यातील सिमेनंतर अर्धा किमी.रस्त्यावर बघावयास मिळते.सदर रस्ता दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा असूनही या रस्त्याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिलेले इंजि.राजकुमार बडोले यांनी आपल्या कार्यकाळात प्रत्येक वर्षी पाच लाख रुपयाचे काम आपल्या जवळच्या कंत्राटदाराला व स्थानिक कार्यकर्त्यांना देत रस्त्याची डागडुजी केले असले तरी यामुळेच या रस्त्याची वाट लागल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.दरवर्षी रस्त्याची डागडुजी होत असल्याने आणि कार्यकर्ता ठेकेदारी करीत असल्याने नागरिक गप्प होते.परंतू आता आमदार बदलताच व राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच या परिसरातील नागरिकांनी आमदारांना या रस्त्याची व्यथा लेखी स्वरूपात दिली.जुन महिन्यापासून आजपर्यंत ५-६ दुचाकीस्वाराचे अपघात होऊन अंपगत्व आले असून या रस्त्यावर अपघात होणे नित्याची बाब झाली आहे.अनेक चारचाकी वाहनतालकांना मोठ मोठे खड्ड्यात पावसाळ्यात पाणी असल्याने रस्ता व खड्ड्याचा फरक कळत नसल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.अर्जुनी मोरगाव कडून येणारे प्रवासी कनेरी,रांका,सौंदड,परसोडी,साकोली जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात.या रस्त्याने १० ते १२ किमी.अंतर कमी होत असल्याने साकोली वरुन कोहमारा मार्गे न जाता चारगाव सौंदड कनेरी मार्गे जाणे येणे करतात.या रस्त्याचे खोदकाम करून डांबरीकरण करण्याची तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नाल्यांचे बांधकाम करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment