Home Breaking News अनुसूचित जाती, ओ बी सी प्रवर्ग,अनुसूचित जमाती व सर्वसाधारण (ओपन) यांसाठी चार...

अनुसूचित जाती, ओ बी सी प्रवर्ग,अनुसूचित जमाती व सर्वसाधारण (ओपन) यांसाठी चार वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका

659
0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

ग्रामीण मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला अनेक रंग असतात, ढंग असतात. यात मतदानात वापरण्यात येणार्‍या रंगबेरंगी मतपत्रिकांचीही भर पडली आहे! येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या 527 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानात 4 रंगांच्या पत्रिकांचा वापर करण्यात येणार आहे.

विधान परिषद वगळता बहुतेक निवडणुकांत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर सामान्य बाब ठरली आहे. याला ग्राम पंचायतच्या लढती देखील अपवाद नाहीत. शहरी मतदारांच्या तुलनेत ग्रामीण मतदार उत्साहाने मतदान करतात. कार्यकारी सोसायटी, बाजार समित्यांसारख्या लढतीत पॅनल टू पॅनल किंवा सहजपणे दोन्ही पॅनलमधील उमेदवारांना योग्यतेनुसार मतदान करतात. याउप्परही त्यांच्या सुविधांसाठी खास निर्णय घेण्यात आला आहे. आताच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना महिला उमेदवार किंवा विविध प्रवर्गातील उमेदवार सहज ओळखता यावा यासाठी 4 रंगांच्या मतपत्रिकांचा वापर करण्यात येणार आहे.

आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार अनुसूचित जातींच्या जागेसाठी फिक्या गुलाबी रंगाची, अनुसूचित जमातीच्या जागेसाठी फिक्या हिरव्या रंगाची, ओबीसी प्रवर्गाच्या जागेसाठी फिक्या पिवळ्या रंगाची तर सर्वसाधारण (ओपन) जागेसाठी पांढर्‍या रंगांची मतपत्रिका वापरण्यात येणार आहे. ही पत्रिका मतदान यंत्रावर चिटकविण्यात येते. मतदान यंत्रांची तपासणी झाल्यावर कार्यकर्त्यांच्या हजेरीत ही प्रक्रिया पार पाडली जाते. यामुळे यंदाची निवडणूक ही प्रचारात व मतदानात रंगीबेरंगी ठरणार आहे.

Previous articleयावल तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी चौथ्या दिवसी४०३ उमेदवारी अर्ज दाखल
Next articleपारंपारिक पद्धतीने अर्ज दाखल करत उमेदवारांत समाधानाचे वातावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here