अपघातग्रस्त कुटूंबास मिळाली आर्थिक मदत

 

प्रतिनिधी-सचिन पगारे
मो.८३२९४२९२२१
नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यातील ढेकू तांडा येथील अपघाती निधन झालेले ऊसतोड कामगार प्रल्हाद चव्हाण यांच्या कुटूंबास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली.
दि.२९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोड कामगार प्रल्हाद फौजमल चव्हाण हे आपली बैलगाडी घेऊन ट्रकने जात असतांना नांदगांव तालुक्यातील कासारी जवळील चांदेश्वरी घाटातील अवघड वळणावर झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.त्यांच्या पश्चात पत्नी अक्काबाई ह्या अशिक्षित असल्याने ११ व १२ वर्षांच्या दोन मुली व ९ वर्षाचा एक मुलगा यांचे पालन पोषण करून शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्या अशिक्षित असल्याने त्यांच्या भावाने नांदगांव प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. संदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन घेतले. तालुका कृषी विभागाकडे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून अर्थ सहाय्य मिळावे यासाठी प्रकरण दाखल केले होते. अर्थसहाय्य मिळताच त्यांनी प्रहार संघटनेचे नेते राज्यमंत्री ना. बच्चु कडु , नांदगाव तालूका प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप सुर्यवंशी , सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, मंडळाधिकारी संकेत कराळे व सुरेश पाढेकर यांचेही आभार व्यक्त केले.

Leave a Comment