Home Breaking News अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बस सेवा सुरू करा.

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बस सेवा सुरू करा.

347
0

 

आज युवा नेते तथा अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ यांचा वतीने विभागीय नियंत्रक म.रा.परिवहन मंडळ अमरावती यांना निवेदन देण्यात आले.

कोरोना लॉकडाउन मोठ्या कालावधीनंतर शासकीय नियमांचे पालन करत राज्य शासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या अनुषंगाने खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांची तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी शाळेत येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील बस सेवा सुरु नसल्याने विद्यार्थ्यांना खुप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. खाजगी वाहनधारक विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बस सेवा सुरु कराव्यात अशी मागणी कुणाल भाऊ ढेपे यांनी केली

Previous articleपारंपारिक पद्धतीने अर्ज दाखल करत उमेदवारांत समाधानाचे वातावरण
Next articleसुनगाव ग्रामपंचायत साठी उमेदवारांनी केली हाफ सेंचुरी(50) पूर्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here