अल्पवयींन मुलीवर बलात्कार, गरोदर केल्या बद्दल त्या नराधमास 10 वर्षाची शिक्षा,

0
519

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

SURYA MARATHI NEWS

पुणे : येथील १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पाणी मागण्याचा बहाण्याने घरात बोलावून आरोपिने तिच्यावर बलात्कार करुन तिला 6 महिंयाची गरोदर केल्याबद्दल विशेष न्यायालयाने ५२ वर्षाच्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.अप्पा यशंवंत साळवे (वय ५२, रा. कुसगाव, लोणावळा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. अप्पा साळवे हा रेल्वेमध्ये सिनियर मेकॅनिक आहे. व या
पिडित मुलीचे आईवडिल मृत्यू पावले असल्याने ती आजीकडे रहात होती. पन टिक आरोपी तेथेच रेल्वे वसाहतीमध्ये रिकाम्या बंगल्यात राहत होता. व फेब्रुवारी २०१७ मध्ये आरोपीने पिडित मुलीला हाक मारुन घरात पाणी घेऊन बोलावले.व तिच्यावर वारंवार बलात्कार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास तिला व तिच्या लहान भावाला मारुन टाकण्याची धमकी दिली. व त्यानंतर त्याने हा प्रकार पुन्हा केला. व काही महिन्यांनी तिचे पोट दुखू लागल्याने तिला डॉक्टरांकडे नेले. ती गरोदर असल्याचे डॉक्टर तपासणीत आढळून आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. लोणावळा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक राधीका मुंडे व उपनिरीक्षक एस जी दरेकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. दरम्यानच्या काळात या मुलीने बाळाला जन्म दिला. पोलिसांनी पिडिता, आरोपी व तिच्या बाळाचे डी एन ए नमुने घेतले. त्याचा अहवाल सकारात्मक आला.
या खटल्यात सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी ७ साक्षीदार तपासले. पिडिता ही या प्रकरणाची महत्वाची साक्षीदार होती. पिडिता व तिचा लहान भाऊ यांचे जानेवारी २०२१ मध्ये निधन झाले. त्यामुळे तिची साक्ष नोंदविता आली नाही. पिडिता हिच्या मृत्युमुळे आरोपीला कोणताही फायदा देता येणार नाही. उपलब्ध तोंडी व लेखी पुरावा आरोपीचा गुन्हा शाबीत होण्यासाठी पुरेसा आहे. तसेच डी एन ए अहवालामध्ये आरोपी हा पिडितेच्या बाळाचा जनक पिता असल्याचा उल्लेख असल्याचा युक्तीवाद ॲड. प्रेमकुमार अगरवाल यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. व या खटल्यात लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर आणि कोर्ट पैरवी अल्ताफ हवालदार यांनी सरकार पक्षाला सहाय्य केले. व आरोपिला अटक करण्यात आली. Surya marathi news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here