Home बुलढाणा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी २५हजार रु नुकसान भरपाई...

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी २५हजार रु नुकसान भरपाई द्या –नितिन राजपुत

470
0

 

चिखली–नियमीत पाऊस कोसळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.सततच्या पावसाने व काल परवा झालेल्या पावसाने सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले असल्याने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्याना हेक्टरी २५हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी स्वाभिमानी चे माजी जिल्हासरचिनटनीस नितिन राजपुत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दि२१सप्टेंबर रोजी केली आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या खरीप हंगामात सध्या काही ठिकाणी पिक काढणी सुरु आहे तर काही ठिकाणी पिके उभी आहेत. अशावेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. या अगोदरही ऑगस्ट महिण्यामधे झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले होते. अशातच जे पिक काढणीसाठी आले होते व रब्बी व खरीप हंगामातही अतिवृष्टी व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले कोरोना लॉकडाऊनमुळे तसेच बोगस बियाणे व खतांच्या तुटवडयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रास सहन करावा लागला आहे. अशातच मोठ्या मेहनतीने उगवलेल्या सोयाबीन, कपाशी, मका, ज्वारी यासह अन्य उभ्या पिकांवर अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी पिक चांगले आले आहे परंतु अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. आधीच चहुबाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर हे मोठे आस्मानी संकट कोसळले असल्याने शेतकर्याना तात्काळ दिलासा देण्याची गरज निर्मान झाली आहे.सरकारने मदत केली नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्ये मध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे.अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्याना हेक्टरी.२५ हजार रु.नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते नितिन राजपुत यांनी जिल्हाधिकारी,तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.यावेळी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Previous articleअवैध्यरित्या सुरु अससलेली बीफ विक्री बंद करा-हिंदू युवा वाहिनी ची मागणी
Next articleकोव्हिड सेंटरमधील वीजप्रवाह खंडित–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here