परांडा:- बरोबर माहेरी जात असल्याचे पाहून चिडलेल्या नवऱ्याने डोक्यात कुराडीचा घाव घालून खून केल्याची घटना सरणवाडी मध्ये घडली.सारिका हरिचंद्र जाधव राहणार सरणवाडी तालुका परांडा यांच्याकडे त्यांची आई लक्ष्मी दादा शिरसागर राहणार माणकेश्वर तालुका भूम या पाहुण्या आल्या होत्या.दिनांक 28 08 2020 रोजी सारिका या आपली मुले समाधान व ऋतुजा सोबत घेऊन आईसह पुणे येथे जाण्याच्या तयारीत होत्या तसे करण्यास पती हरिचंद्र भीमराव जाधव यांनी पत्नी सारिकास विरोध केला तो विरोध पत्नी सारिका हिने न जुमानल्याने चिडून जाऊन हरिचंद्र जाधव यांनी सायंकाळी 4:45 वाजता कुर्हाडीने पत्नी सारिका व सासू लक्ष्मी यांच्या डोक्यात घाव घालून त्यांचा खून केला अशा मजकुराच्या राहुल दादा शिरसागर राहणार मानकेश्वर यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरून भा.दं.सं.कलम 302 अनवे गुन्हा नोंदविला आहे .