आता ऑफलाईन स्विकारणार उमेदवारी अर्ज.तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रातही सूट…

0
661

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

 

 

इंटरनेट चा स्पीड कमी, सर्व्हड डाऊन यासह इतर तांत्रिक अडचणींमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहत आहेत. असे उमेदवार वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज पारंपारिक पद्धतीने अर्थात ऑफलाईन स्वीकारणाचा निर्णय घेतला आहे. शिवाय उद्या, 29 डिसेंम्बर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळही वाढवून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करण्यात आली आहेत. प्राप्त माहितीनुसार इंटरनेटमुळे अनेकांच्या अर्जाचा घोळ होत होता. वरील निर्णयाच्या अनुषंगाने आता इच्छूकांना अर्ज करणे सोपे झाले आहे. नामनिर्देशनपत्रे आणि कोरे नमुने तत्काळ उपलब्ध करावे, असेही आदेश निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. सदर आदेशावर राज्याचे निवडणूक आयोग सचिव किरण कुरुंदकर यांची स्वाक्षरी आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्रातही सूट

_ऑनलाईन प्रणालीचा मंदावलेला वेग लक्षात घेता आता २९ डिसेंबर आणि ३० डिसेंबर २०२० या दोनही दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने जात पडताळणी प्रमाणपत्राचा अर्ज स्विकारण्याच्या सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितींना दिले आहेत. ज्या अर्जदारांचे ऑफलाईन पद्धतीने अर्ज दिले आहेत, त्यांची माहिती विहीत नमुन्यात पाठविण्याचेही नमूद करण्यात आले आहे. उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची किंवा जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने अर्जदारांची गैरसोय होवू नये म्हणून ऑफलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here