आदिवासींच्या न्याय हक्क मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा भव्य मोर्चा

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या न्याय हक्क व मागण्यासाठी यावल तहसील कार्यालया वरती रिपब्लिकन पार्टी
ऑफ इंडिया तर्फे जिल्हा अध्यक्ष राजु भाऊ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका अध्यक्ष विष्णू भाऊ पारधे तसेंच रावेर बोदवड भुसावळ येथील तालुकाध्यक्ष व आदिवासी अध्यक्ष महिलावर्ग यांच्या तर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला .

हा मोर्चा यावल तालुक्यातील बोरावल गेट ते तहसील कार्यालयापर्यंत आणण्यात आला या मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते .परंतु संबंधित अधिकारी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर तसेच गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड वन विभाग अधिकारी विक्रम पदमोर व आदिवासी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे उपस्थित नसल्यामुळे हे आंदोलन चार तास तहसील कार्यालया समोर सुरू होते विविध घोषणांनी तहसील कार्यालयातील परिसर दणाणून सोडला होता

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी यांना कृषी कायदा लागू करण्यात यावा बियाणे मोफत देण्यात यावे शेतकऱ्यांच्या सर्व सोयी सुविधा त्यांना लागू करण्यात यावा आदिवासींचे सुरू असलेले वन दावे तात्काळ मंजूर करून सातबारा त्यांच्या नावावरती करण्यात यावा ग्रामपंचायत मार्फत घरकुल योजनेचा लाभ त्यांना देण्यात यावा आदिवासी प्रकल्प अंतर्गत ठक्कर बाप्पा योजना आदीवासी वस्तीपाड्यामध्ये राबविण्यात यावी आदिवासी वस्तींमध्ये पाणीपुरवठा साठी पाईपलाईन करण्यात यावी रस्ता काँक्रिटीकरण गटारी करण्यात याव्या

आदिवासी विकास प्रकल्प यांचे वरिष्ठ अधिकारी आदिवासी पाड्यांवर न फिरता दलाला मार्फत सर्वे करीत असल्यामुळे आदिवासींपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचत नाही त्याकरिता वरिष्ठांकडून समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी आदिवासी आश्रम शाळांमध्ये आदिवासींच्या मुलांना प्रवेश दिला जात नाही दमदाटी करून हाकलून देण्यात येते तसेच शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येते त्यामुळे मुख्याध्यापक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी पहिली ते पाचवी शिक्षण अभियानांतर्गत प्रत्येक आदिवासी वस्तीमध्ये शाळा उभारण्यात यावी

व त्या ठिकाणी एसटी महामंडळाची बस येण्या जाण्याकरता उपलब्ध करून देण्यात यावी तसेच यावल तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे त्याचप्रमाणे जे आदिवासींना रेशन कार्ड मिळाले आहे त्यांना आतापर्यंत धान्य मिळत नाही त्यांना धान्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहे तरी सर्व आदिवासींना बारा अंकी नंबर टाकून धान्य उपलब्ध करून देण्यात यावे त्याचप्रमाणे तालुक्यातील रेशन धान्य दुकानदार हे धान्य काळ्या बाजारात विकतात

त्यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी यावल शहरातील सिद्धार्थ नगर पंचशील नगर बाबा नगर श्रीराम नगर या वस्त्या शंभर वर्षांपूर्वीच्या अधिक वर्षापासून राहत असल्यामुळे तेथील अतिक्रमण कायम करावे व कायम करून नमुना नंबर 8 चा उतारा द्यावा त्या ठिकाणी घरकुल योजना राबवावी तसेच मारुळ व चीतोडा या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी दलित वस्ती अंतर्गत पंधरावा वित्त आयोग अंतर्गत ऑफलाइन टेंडर करण्यात आलेले आहे पाच वर्षापासून सरपंच व ग्रामसेवक ऑफलाईन टेंडर मध्ये मक्तेदाराला टेंडर मॅनेज करून देतात प्रत्येक टेंडर मध्ये तीन तीन मक्तेदार आले पाहिजे परंतु त्यांनी एकच मतेदाराची निविदा येऊन टेंडर करण्यात आले

शासनाचे नियमानुसार तीन-तीन टेंडर मक्तेदार आल्याशिवाय टेंडर ओपन करता येत नाही या दोन्ही ग्रामपंचायतीचे एक एक मक्तेदार बोलून टेंडर ओपन केली आहे याबाबतची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच अकलूद येथील ग्रामपंचायत अंतर्गत ओपन फेज वरील झालेल्या अतिक्रमण काढण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना दिनांक 2 6 23 रोजी निवेदन देण्यात आले होते परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती यावल गट विकास अधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याकरता सुचवले होते

त्यावर 16/6/23 रोजी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्यासमोर चौकशीसाठी हजर असताना गटविकास अधिकारी यांनी आम्हाला समक्ष बोलवून आम्हास वरील तारीख दिली नाही किंवा 16/6/230रोजी आम्हाला या संदर्भात बोलून आमची खिल्ली उडवली व या संदर्भात आम्हाला अवगत केले नाही त्यामुळे सहाय्यक गट विकास अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी समोरच्या पार्टीला बोलावून सन्मानाने खुर्ची टाकून बसविले कारण त्यांच्याकडून आर्थिक व्यवहार करणार होते

तसेच यावल सहायक गट विकास अधिकारी के .सी सपकाळे यांनी अर्वाच भाषेत बोलत हे तुमचे घर नाही आमचे कार्यालय आहे आम्ही कुणाला बसवायचे आमचा अधिकार आहे समोरील पार्टी के सी सपकाळे गटविकास अधिकारी यांचे नातेवाईक असल्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रकार होत आहे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या आदेशाचे सुद्धा उल्लंघन झाल्याचे दिसत आहे त्यामुळे पंधरा दिवसात चौकशी करून संबंधितांना कारवाई करण्यात यावी

तसे न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षातर्फेंबर उपोषण करण्यात येण्याचा इशारा देखील राजूभाऊ सूर्यवंशी यांनी दिला आहेत्याचप्रमाणे यावल तालुक्यातील सहाय्यक गट विकास अधिकारी के सी सपकाळे पंचायत समिती यावल हे नियमाने तीन वर्ष कालावधी एका ठिकाणी काम करण्याचे बंधनकारक असून तरी देखील आज दहा वर्षापासून ते यावल पंचायत समिती येथे एकाच ठिकाणी कार्यरत आहे त्यामुळे पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वेग मिळत आहे के सी सपकाळे प्रवीण सूर्यवंशी राहणार सातोद कोळवद यांच्याशी सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी हात मिळवणी करून ऑनलाईन टेडरमध्ये हस्तक्षेप करून टेंडर मॅनेज करण्याचे काम करीत असतात टेंडर पब्लिश करीत असतात कायद्याला सोडून मनमर्जी प्रमाणे अटी व शर्ती टाकत असतात प्रवीण सूर्यवंशी यांचा कम्प्युटर वरून पाच वर्षापासून संपूर्ण यावल तालुक्यातील ग्रामपंचायत करणे टेंडर भरणे सर्व ठेकेदारांचे टेंडर तिथून भरले गेले आहे व संपूर्ण तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्या डि एस सी प्रवीण सूर्यवंशी यांच्याकडेच असतात पाच वर्षांमध्ये यावल तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये ऑपरेटर मार्फत ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीच्या कॉम्पुटर कोणतेही टेंडर भरले नाही हे सर्व मॅनेज करून देणारे सहाय्यक गट विकास अधिकारी के सी सपकाळे व प्रविण सूर्यवंशी ग्रामसेवक सरपंच अशा पद्धतीने ऑनलाईन सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करून भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे के सी सपकाळे यांची सखोल चौकशी करण्यात यावी त्याचप्रमाणे त्यांचे तात्काळ बदली करण्यात यावी .

हिंगोणा ग्रामपंचायत दलीत वस्ती अंतर्गत 2020 ते 2023 15 वित्त आयोग .भारत मिशन या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मार्फत ठराव घेऊन एकेक मक्तेदार घेऊन टेंडर मॅनेज करून दिली आहेत शासन नियमानुसार प्रत्येक टेंडर मध्ये तीन तीन मक्तेदार आले पाहीजे याची चौकशी करण्यात यावी हा विषय ऑफलाइन केलेल्या टेंडरचा आहे म्हणून चौकशी करण्यात यावी यावल तालुक्यातील दलित वस्ती पंधरा वित्त योजनेअंतर्गत ऑफलाईन कामाचे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले आहेत ही सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने टेंडर व्हावे जेणेकरून भ्रष्टाचार थांबेल असे लक्षात घेऊन कार्यवाही करावी असे न झाल्यास मोठ्या संख्येने आमरण उपोषणाचा इशारा राजूभाऊ सूर्यवंशी यांनी दिलेला आहे

Leave a Comment