Home Breaking News आमदार पुत्र निरज रायमुलकर यांच्या वाहनाचा जालना जवळ टायर फुटून अपघात !...

आमदार पुत्र निरज रायमुलकर यांच्या वाहनाचा जालना जवळ टायर फुटून अपघात ! ४ जण किरकोळ जखमी !

548
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर मतदार संघाचे शिवसेना आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांचा मुलगा निरज रायमुलकर यांच्या इनोव्हा गाडीचा दि . ९जानेवारीच्या रात्री १२ चे दरम्यान जालना येथे अपघात होऊन मुलासह पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत#शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचा मुलगा निरज संजय रायमुलकर व त्याचे मित्र काल दि.९ ला संभाजीनगरला गेले होते. परत येताना जालना शहरातील कन्हेयानगर ते बीड बायपास रस्त्यावर गाडीचे (क्रमांक MH 28 BK 2777) टायर फूटून तीने रस्त्याच्या खाली ३ते ४ पलटी घेत सरळ झाली. या अपघातात निरज संजय रायमुलकर, वरद ठाकूर, ऋषी पागोरे,प्रतिक इंगळे, व सुनील पंडारे किरकोळ जखमी झाले. निरज रायमुलकर हे स्वतः वाहन चालवत होते.सुदैवाने आ.संजय रायमुलकर काल मेहकर येथे होते. तर एक वर्षापूर्वी याच तारखेला मेहकर जानेफळ रस्त्यावर आ.संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यात आ.संजय रायमुलकर यांना दुखापत झाली होती.

Previous articleनिरोड अतिक्रमण धारकांचा नमुना ८अ चा प्रश्नन मार्गी लावणार. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे आश्र्वासन.
Next articleटूनकी येथे खुलेआम रेती तस्करी सुरूच कारवाई मात्र शून्य , महसुल विभागाचा साफ दुर्लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here