चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील आश्रम शाळेत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार 7 ऑगस्ट रविवारला करण्यात आली असून या प्रकरणी आश्रमशाळा अधिक्षक संजय इटनकर यास अटक करण्यात आली.
हिंगणघाट येथील पीडित बालिका रहिवासी असून संबंधित अल्पवयीन मुलीचे स्वास्थ बरोबर नसल्यामुळे तिचे पालक मुलीला भद्रावती येथील आश्रम शाळेत घेण्याकरिता गेले होते.
हिंगणघाट येथे आल्यानंतर दरम्यानचे काळात मुलीची प्रकृती बिघडली,तसेच ती मुलगी मानसिक दबावात दिसून आली यामुळे शंका आल्याने कुटुंबियांनी मुलीला विचारपूस केली असता 7 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान लैंगिक शोषण करण्यात आल्याची माहिती दिली, आरोपी संजय इटनकर राहणार
पराग तांडा तालुका भद्रावती वस्तीगृह येथे अधिक्षक
आहे.त्याने घृणास्पद प्रकार केला असून कुणालाही याबद्दल सांगितले तर चाकूने तुझा जीव घेऊ अशी आरोपीने धमकी दिली होती.
या प्रकरणी हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटकसुद्धा केली,आरोपीवर पोस्कोसह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद केला असून संबंधित प्रकरण घटनास्थळ भद्रावती पोलीस स्टेशन असल्यामुळे हिंगणघाट पोलीस निरीक्षक पुंडकर यांनी हा गुन्हा भद्रावती पोलिसांकडे वर्ग करण्यात आला यामुळे पुढील तपास भद्रावती पोलिस करणार असल्याची माहिती दिली.