आसलगाव ग्रामपंचायत प्रशासकपदी मोरे रुजू

 

जळगांव जा.प्रतिनिधी

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत आसलगाव च्या ग्रामपंचायत प्रशासक पदी विस्तार अधिकारी श्री संदीप मोरे रुजू झाले असून जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ग्रामपंचायत सर्वात मोठी असून सदस्यसंख्या 17 आहे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा कार्यकाल आज दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी संपुष्टात येऊन पंचायत समिती जळगाव जामोद चे विस्तार अधिकारी श्री संदीप मोरे हे आज रुजू झाले त्यांचा सत्कार सरपंच वैशालिताई येनकर यांनी शाल व श्रीफळ देऊन केला तसेच गावातील समाजसेवक प्रकाश ढोकने यांनी सुद्धा गावक-यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळेस ग्रामसेवक धीरज मारोडे विजय तिवारी, सुनील येनकर, अरविंद भारसाकडे, श्रीकृष्ण भेलके, लहू भारसाकडे, राधेश्याम केला, गजानन येनकर, महादेव श्रीनाथ, सुनील दांडगे, श्याम देवताळू,

ग्राम पंचायत कर्मचारी मधू इंगळे, श्रीकांत पाठक, मंगेश बोराखडे,

तसेच गावातील पत्रकार गणेश गि-हे सुद्धा उपस्तीत होते

कार्यक्रम प्रसंगी प्रशासक संदीप मोरे म्हणाले की गावाचा विकास करणयासाठी मला गावकऱ्यांची साथ म्हणजे तुमची साथ लागेल आणि आपण जिल्हा परिषद मधून जेवढा निधी गावातील विकासा साठी आणता येईल तेवढा विकास निधी आणून आपण गावाचा विकास करू असे त्यांनी गावातील नागरिकांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Comment