इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे.महाविकास आघाडीचं लुटारूंचं राज्य जाऊ दे…!!

 

 

याकरिता आज रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार रयत क्रांती संघटना संग्रामपूर तालुका बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने व पक्षाच्या वतीने बैल बळीराजाला साकड घालण्यात आले . इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे…!
महाविकास आघाडीचं लुटारूंचं राज्य जाऊ आशा घोषणा देण्यात आल्या
या वेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हासहप्रमुख विठ्ठल पाटील जिल्हाध्यक्ष नाना पाटील तालुकाध्यक्ष गणेश मानखैर जळगाव तालुकाध्यक्ष प्रवीण गिरी रशीत शेख राजुभाऊ असलम शेख अजय खीरोळकार महादेवराव मानखैर ईतर शेतकरी सहभागी होते..
आज आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीने “इडा पिडा टळु दे बळीराजाचं राज्य येऊ दे” महाविकास आघाडीचं लुटारुंचं राज्य जाऊ दे याकरिता राज्यभर आज बळीराजाला साकडं घालण्यात आलं.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे शेतकऱ्यांवर आणि कष्टकरी जनतेवर आजवर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडीला चोख उत्तर आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं कधीच पूर्ण केली गेली नाहीत किंवा शेतकरी हितासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. आणि फक्त जनतेची लुटमार सध्याच्या आघाडी सरकारने केली. उपेक्षित वर्गातील लोकांसाठी रयत क्रांती संघटना नेहमीच आपला बुलंद आवाज सरकार समोर मांडत आलेली आहे.

म्हणूनच या सरकारला कंटाळून महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी वर्ग लुटारूंचं हे सरकार जाऊन कधी एकदा बळीराजाचं राज्य येईल आणि त्या राज्यात शेतकरी कष्टकरी सुखी असतील अशी इच्छा व्यक्त करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी हितासाठी लढणाऱ्या रयत क्रांती संघटना ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून चौकाचौकात तर ह्या सरकारच्या भकासकामांना कंटाळलेल्या शेतकऱ्यांकडून बांधा बांधावर “इडा पिडा टळु दे बळीचं राज्य येऊ दे” महाविकास आघाडी सरकारचं लुटारूंचं राज्य जाऊ दे याकरता बळीराजाला साकडं घालण्यात आलं.

Leave a Comment