सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
ता.मेहकर ऊकळी सुकळी 06/12/20 रोजी तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला..!
याप्रसंगी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई व अनिल भाऊ देबाजे ,प्रमोद भाऊ अंभोरे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहिली व भव्य कॕन्डल मार्च रॕली काढण्यात आली..
यावेळी मा.अनिल भाऊ देबाजे यांनी आपल्या मार्गदर्शनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला
या अभिवादन कार्यक्रमास तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र सचिव अनिल भाऊ देबाजे, सतीश शेटाने, आकाश तुरुकमाने, करण राऊत, सुरज शेटाने, प्राध्यापक विठ्ठल सावंत सर, विनायक तुरूकमाने, हर्षल राऊत, सतीश तुरुकमाने, राहुल साबळे, अमर अंभोरे, उमेश मोरे, राहुल तुरुकमाने, गुलाब तुरुकमाने, चेतन देबाजे, सचिन तुरूकमाने, भिमराव ठोके, शुभम शेटाने, रोहित झरे, पवन अंभोरे, अविनाश वाघमारे, रोहित तुरुकमाने, स्वप्नील मोरे, वैभव मोरे ,सुजित तुरुकमाने आदी उपस्थित होते