अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी
स्थानिक एफ एम काशेलानी स्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात यावर्षी विविध उपक्रमांसह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आठवडा साजरा करण्यात आला. काशेलानी स्कूल मध्ये देखील आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. ज्यात ९ ऑगस्ट रोजी चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा मोहिमीची माहिती देण्यात आली त्यानंतर सामूहिक राष्ट्रगान घेऊन सर्व विद्यार्थी आणि शिक्षिकांनी शाळेची आणि परिसराची स्वच्छता केली. 10 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन ला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांना राखी बांधली. १२ ऑगस्ट रोजी शाळेमध्ये फँसि ड्रेस स्पर्धा आणि आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १३ ऑगस्ट रोजी झाडांना राखी बांधणे, निबंध स्पर्धा आणि शहरातून प्रभात फेरी काढiण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप केले. १५ ऑगस्ट रोजी शेगांव ग्रामीणचे ठाणेदार श्री. राहुल जंजाळ सर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांनी नृत्य आणि भाषणे सादर केली. १७ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शाळेचे मुख्याधापक श्री. कुणाल काशेलानी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना मार्गदर्शन केले.