Home Breaking News ए टी एस आणि पोलीसांची सयुक्त कारवाई , दोन पितूलसह तीन काडतुस...

ए टी एस आणि पोलीसांची सयुक्त कारवाई , दोन पितूलसह तीन काडतुस हस्तगत – -आरोपीस अटक

694
0

 

(सूर्य्या् मराठी न्युज )

साखरखैर्डा बसस्थानकावर साखरखेर्डा पोलीसांनी ए टी एस च्या मदतीने स्थानिक आरोपीस मुद्दैमालासह अटक केली आहे . उपरोक्त घटणेमुळे गावात खळबळ उडाली आहे .
साखरखेर्डा बसस्थानकावर एका कुरीयर वाल्याकडून एक पार्सल घेऊन जात असतांना साखरखेर्डा येथील गोपाल रामसिंग शिराळे या युवकाला ए टी एस पथकाने साखरखेर्डा पोलीसांच्या मदतीने पकडले . आज दुपारी तीन वाजता ही कारवाई करण्यात आली . पोलीसांना गुंगारा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला असता , अगोदरच पोलीसांनी सापळा रचला असल्याने त्याला पकडले . साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये आणले असता शासकीय कर्मचारी पंचासमक्ष कुरियरने आलेला बाॅक्स उघडला असता , त्यामध्ये दोन पिस्तूल सह मॅगझीन आढळून आले . गोपाल शिराळे यांच्यावर या अगोदर अनेक गुन्हे दाखल आहेत . आजच्या या मोठ्या कारवाई मुळे साखरखेर्ड्यासह संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . या कुरिअर संबंधीत गावातील काही व्यक्तींचा संबंध असू शकतो का ? या दिशेने पोलीस आणि ए टी एस पथक तपास करणार असल्याचे समजते .दरम्यान अकोला येथील ए.टी .एस .च्यापथकाने केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण साखरखेडा व परिसरामध्ये खळबळ माजली आहे !आता आणखी कोणकोण या प्रकरणाशी संबंधित आहे याची चौकशी आता पोलिस करत आहेत !ची माहिती साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिली आहे ।

Previous articleकृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ . सी . पी . जायभाये यांची शिंदी येथील डाळिंब बागची पाहणी !
Next articleमाजरंम गावात साकारणार गाव जल सुरक्षा व शाश्वत आराखडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here