सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी
शहरातील कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी महापालिकेने सहा एन्ट्री पॉइंट व मध्यवर्ती व सिडको बसस्थानकावर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात हजारो प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे शहरातील संभाव्य संसर्ग टळला. मात्र सध्या रस्त्यावरील रहदारी व प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असून, प्रत्येक वाहन थांबविणे शक्य नसल्यामुळे चाचण्या बंद करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. आता शहरात पाच ठिकाणी चोवीस तास चाचणीची केली जाईल व ११ सेंटरवर सकाळी १० ते सहा यावेळेत चाचण्या केल्या जाणार आहेत.
मात्र आता नागरिक स्वतः होऊन चाचणी करण्यासाठी समोर येत असल्याने टास्क फोर्स बंद करण्यात आले. त्यानंतर आता सिटी एन्ट्री पॉइंटवरील व बसस्थानके, रेल्वेस्टेशनवरील चाचण्या बंद केल्या आहेत. असे असले तरी शहरात पाच ठिकाणी चोवीस तास, तर ११ ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत चाचण्या केल्या जाणार आहेत.
ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे म्हणजेच ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा जाणवणे किंवा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यास चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे. नागरिकांसाठी ८९५६३०६००७ या क्रमांकावर मदत उपलब्ध आहे.
इथे असेल २४ तास सेवा
१) सिपेट, चिकलठाणा एमआयडीसी
२) एमजीएम स्पोटर्स कॉम्पलेक्स
३) पदमपुरा अग्निशमन केंद्राशेजारील इमारत
४) एमआयटी मुलांचे वसतीगृह सातारा परिसर
५) समाज कल्याण मुलांचे वसतीगृह किलेअर्क
या ठिकाणी सकाळी १० ते ६ चाचण्या
१) सिडको एन-८ रुग्णालय
२) चिकलठाणा आरोग्य केंद्र
३) बायजीपुरा आरोग्य केंद्र
४) सिडको एन-११ आरोग्य केंद्र
५) आरोग्य केंद्र हर्षनगर-गितानगर
६) आरोग्य केंद्र राजनगर
७) छावणी परिषद रुग्णालय
८) तापडीया मैदान अदालत रोड
९) रिलायन्स मॉल, गजानन महाराज मंदिरासमोर
१०) सिडको एन-२ कम्युनिटी सेंटर
११) प्राथमिक आरोग्य केंद्र शिवाजीनगर