Home Breaking News किनगाव पपई ट्रक पलटी भिषण अपघातातील व्यापारी आणी वाहन चालकास तिन दिवसाची...

किनगाव पपई ट्रक पलटी भिषण अपघातातील व्यापारी आणी वाहन चालकास तिन दिवसाची पोलीस कोठडी

554
0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या पपई वाहकतुक करणारा आयशर वाहन पलटी होवुन झालेल्या मन हेलावणाऱ्या अशा भिषण अपघातात १३ मजुरांसह दोन बालकांचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली होती , दरम्यान पोलीसांनी या अपघातास कारणीभुत म्हणुन वाहनचालक शेख जहीरोद्दीन शेख बदरूद्दीन राहणार रावेर आणी पपई खरेदी व्यापारी अमीन शाह रज्जाक शाह रा. केऱ्हाळा ता . रावेर यांना आरोपी केले असुन त्यांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , आज या दोघांआरोपींना यावल न्यायलयात हजर केले असता त्यांना दिनांक १८ फेब्रुवारीपर्यंत तिन दिवसाची ची पोलीस कोठडी देण्यात आली आहे . या संदर्भात यावल पोलीसांनी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी घडलेल्या अपघाता विषयी विविध विभागाकडुन चौकशी अहवाल मागविले असुन , याकामी त्यांना पोलीस कर्मचारी संजय तायडे व त्यांच्या पोलीस सहकारी कर्मचारी कार्य करीत आहे . पोलीसांनी मागविलेल्या तपासकामी अहवाल पुढीलप्रमाणे असुन ,यात वाहनचालक हा वाहनचालवितांना दारूच्या नशेत होता का ? याबाबतचा वैद्यकीय तपासणी अहवाल, वाहनाची कालमर्यादा तपासणी अहवाल , एका मालवाहु वाहनात मजुर बसविण्याची संख्याही किती असावी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन रस्ताच्या संदर्भात अहवाल , जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कोरोनासंदर्भात नियमांचे क्षमतेपेक्षा अधिक मजुर वाहतुक करून नियमांचे उल्लघन करणे, वाहनात क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतुक करणे , अशा विविध कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग यावल , आरोग्य तपासणी विभाग , रस्ते सुरक्षा विभाग जळगाव अशा विभागाकडे अहवाल मागविला आहे . या सर्व पार्श्वभुमीवर वाहनाची कालमर्यादा संपली असुन सदरचा वाहन परमीट आणी वाहनचालकाचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव संबधीत विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त मिळाले आहे . दरम्यान अशा प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीची तपासणी करण्याचा अधिकारी हे जिल्हा रस्ता सुरक्षा पथकाची जबाबदारी आहे .अशा प्रकारच्या वाहनांवर या पथका कडून आजपर्यंत किती वाहनांवर कारवाई झाली किंवा काय या पथकाची जबाबदारी काय व कशी याची माहीती अद्याप आजपर्यंत कळालेली नाही . या सर्व गोंधळलेल्या कारभारत जिल्हा रस्ता सुरक्षापथकाची भुमिकाही पारदर्शक दिसुन येत नाही अशी संत्पत प्रतिक्रीया व्यक्त होत आहे . यावल रावेर आणी चोपडा या परिसरात शेकडो कालमर्यादा संपलेली विविध वाहनप्रवासी वाहतुक करीत असुनही बाब रस्ता सुरक्षापथकाच्या निदर्शनाश येत नाही म्हणजे हे नवल म्हणावे लागेल .

Previous articleआर .आर .आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत जळगाव जा तालुक्यातील सुनगाव ने पटकाविला सुंदरगाव होण्याचा पुरस्कार
Next articleकिनगाव बस स्थानकावर बसथांबत नसल्याने विद्यार्थीनी केला एसटी बसचा घेराव आगार प्रमुखांच्या आश्वसनाने घडवुन आला समेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here