अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.
चामोर्शी:-आज दिनांक १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाचे दैवत,प्रेरणास्थान, जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती परधान समाज कुरूड च्या वतीने मोठ्या उत्साहात,आनंदात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.
जयंती निमित्ताने जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावात नाचत-गाजत रॅली काढण्यात आली.जनजागृती मोहीम राबवून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.मिरवनुकीत परधान समाजातील सर्व पुरुष महिला,युवक-युवती व गावातील इतर नागरिक, तसेच बाहेर गावातील मान्यवर मंडळी सहभागी झाले होते.
दरम्यान डॉ किरसान,महेंद्र ब्राम्हणवाडे,राजेश ठाकुर, सरपंच विनोद मडावी, मुख्याध्यापक बंडू सेडमेक,गट साधन केंद्र चामोर्शीचे विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,देवळीचे डॉ मेश्राम,पोलिस पाटील यामिना भोयर,महेश परचाके,पांडुरंग तलांडे,सुरेश मरसकोल्हे,मोरेश्वर गेडाम,राजेंद्र गेडाम,सुभाष मडावी,कालिदास मडावी, प्रमोद परचाके,छगन टेकाम,रामदास सडमाके,महेश मडावी व सर्व विर बिरसा मुंडा आदिवासी परधान समाज संघटना कुरूड आणि गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ मेश्राम, विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते व मुख्याध्यापक बंडु सेडमाके यांचे उपस्थित बहुसंख्य नागरीकांसाठी मार्गदर्शन लाभले.