कृषिदूतांनी पटवले परसबागेतील कुक्कुटपालनाची संधी_

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित स्वा. विर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, जळगांव (जा.) येथील सातव्या सत्रातील प्रथमेश सुरेश काळपांडे, दीपाली जीवनलाल भिलावेकर, आचाल किशोरसिंग राजपूत या कृषिदूतांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम’ अंतर्गत सुनगांव येथे परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर शेतकऱ्यांमध्ये जागृती केली.
“कृषिपुरक व्यवसायामध्ये परसबागेतील कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांना आणि तुलनेने सोपा व्यवसाय ठरू शकतो”, हेच औचित्तसाधत कृषिदूतांनी परसबागेतील कुक्कुटपालन या विषयांवर चर्चा केली. यावेळी कृषिदूतांनी परसबागेतील कुक्कुटपालनाची गरज पटवून सांगतांना सर्वप्रथम पारंपरिक पद्धतीने पाळल्या जाणाऱ्या देशी जातींची चर्चा केली व सोबतच परसबागेतील कुक्कुटपालनासाठी उपयुक्त सुधारित जातींची माहिती व यांच्यातील साम्यता पटवून दिली. प्रामुख्याने देशी जातींच्या कोंबड्यांची अंडी (६०-७० नग प्रति वर्ष) व मांस उत्पन्न अत्यन्त कमी प्रमाणात असते, तसेच सुधारित जातींचा वापर करून सहजरित्या आपण हेच उत्पन्न (१६०-२००अंडी प्रति वर्ष) व मांसाचे उत्पन्न ही वाढवू शकतो हे पटवून दिले. याजातींना कुठल्याही प्रकारची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने आपण ह्यांचे उत्पन्न घेऊ शकतो. यावेळी आधुनिक जातींचे उदाहरण देताना गिरीराज, वनराज, सुवर्णधरा, इ. या जातीं ची माहिती दिली.
परसबागेतील कुक्कुटपालन या कृषिपुरक व्यवसायाचे अवलंब केल्यास कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळू शकते, व त्याच अनुषंगाने सर्वसाधारण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होऊ शकते. परसबागेतील कुक्कुटपालन याचा अवलंबकरता ग्रामीण भागात तरुण, शेतमजूर, स्त्रिया या सर्व उत्पादनासाठी नवीन संधी म्हणून बघू शकतात, असे आवर्जून पटवून सांगितले. यावेळी तुकाराम ढोले व इतर शेतकरी बंधू उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी कृषिदूतांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई सर, कार्यक्रम अधिकारी अविनाश आटोळे सर, कार्यक्रम समनव्यक व्ही. टी. कपले मॅडम व पशुसंवर्धन विषयतज्ञ महेश आखूड सरांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment