संग्रामपूर ः- दिल्ली येथे कृषी कायद्यांच्या, विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज २६ जानेवरी गणतंत्र दिनी संग्रामपुर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मार्च काढण्यात आला. . संग्रामपुर बस स्टॅंड ते तहसिल कार्यालयापर्यंत बैलगाडीने हा मोर्चा काढण्यात आला . शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत .याकरीता संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने आज २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांचे पारंपारिक वाहन बैलगाडीचा मार्च काढून तहसीलदार मार्फत मा.राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले . निवेदनात असे नमुद केले की, देशात तीन कृषी विधेयक लागू करण्यात आले असून हे तिन्ही कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. तिन्ही कृषी विधेयकात एकही मुद्दा शेतकरी हिताचा नाही उलट हि संपुर्ण विधेयक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी आहेत. आम्ही संग्रामपुर तालुक्यातील शेतकरी आहेात आज आमची शेतीची कामे सोडुन आम्ही आमच्या बैलगाडया घेऊन हे निवदेन द्यायला आलो आहोत.तिन्ही कृषी विधेयक कायदे तात्काळ रद्द करावेत अशा स्वरुपाचे निवेदन सादर केले. हे कायदे रद्द झाले नाही तर आम्ही सुध्दा तालुक्यात तीव्र आंदोलन करुन अशा इशाराही या निवेदनातुन देण्यात आला आहे.हयावेळी भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम अश्या घोषणा देत, बैलगाडी सह तिरंगा घेऊन मोर्चा शांततेत काढण्यात आला. हया आंदोलनात बहुसंख्य़ शेतकरी सहभागी होते.