कृषी कायद्याविरोधात जळगाव जामोद येथे किसान सभेचे एक दिवसीय धरणे आंदोलन…

0
327

 

गजानन सोनटक्के
जळगांव जामोद प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर गेल्या १८ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र केंद्र सरकार आंदोलनाची दखल न घेता आंदोलन दडपण्याकरीता अमानुषपणे शेतकऱ्यांशी वागत आहे. या आंदोलनामध्ये केलेल्या मागण्या मान्य करण्यास हुकूमशाही सरकार तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेच्या वतीने जळगांव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक १४ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करून एसडीओ यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.दिल्ली येथे 18 दिवसांपासून संपूर्ण देशातील शेतकरी केंद्र सरकारच्या नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत या आंदोलनामध्ये आतापर्यंत 15 ते 20 शेतकरी मरण पावलेले तरीसुद्धा या झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग येत नाही त्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशामध्ये जो शेतकरी दिल्ली येथे जाऊ शकत नाही त्यांनी स्थानिक तहसील कार्यालय एक दिवशीय धरणे आंदोलन करून या सरकारला जागे करावे त्यासाठी जळगाव जामोद किसान सभेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला संघटनेचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी पाठिंबा दिला त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना समाजवादी पार्टी,स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच इतर संघटनांनी आपला पाठिंबा दिला या आंदोलनामध्ये किसान सभेचे विजय पोहनकर, रामेश्वर काळे तर वंचित बहुजन आघाडीचे, सुनील बोदडे,भास्कर भगत, इज्जतबेग साहेब,समाजवादीचे, मुस्ताक भाई , शहराध्यक्ष नफिसभाई , काँग्रेसचे अविनाश उमरकर, राष्ट्रवादीचे एडवोकेट संदीप उगले,शिवसेनेचे दत्ताभाऊ पाटील,गजानन वाघ, एल्गार संघटनेचे अजहर भाई देशमुख, आशिष पाटील,मौलाना, इरफान शेट्टी इम्रान भाई,यांच्यासह विविध पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या धरणे आंदोलना ठिकाणी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here