कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लग्नपत्रिका घरोघरी न देता व्हाट्सअप वरून पाठवण्याचा नवीन फंडा !सोशल मीडियाचा पुरेपूर वापर !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मागील एक वर्षापासून कोरोना विषानू या जीवघेण्या महामारी मुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते .

ठरलेले लग्न हे लोकांनी रद्द केले होते तर काहींनी फक्त चार ते पाच लोकांच्या उपस्थितीत तोंडाला मास्क लावून हाताला सॅनिटायझर लावून लग्न लावले होते !

परंतु मागील महिन्यापासून लॉक डावून पूर्णतः खुले झाल्यानंतर कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी लग्नसराईला सुरुवात झाली आहे .

 

दुसरी बातमी वर पण एक क्लिक

https://www.suryamarathinews.com/post/8209

 

अनेकांनी लग्नपत्रिका सुद्धा छापलेल्या आहे ‘परंतु सुरक्षितता म्हणून अजूनही नातेवाईक हे पाहिजे तसे फिरत नाहीत ।याचाच परिणाम म्हणून घरातील सदस्यांचे लग्नपत्रिका ह्या घरोघरी न देता !

समोरच्या व्यक्तीच्या व्हाट्सअप क्रमांकावरून त्यांना पाठवण्यात येत आहेत !हा नवीन फंडा सध्या चोहीकडे सुरू झाला आहे !व्हाट्स अप व फेसबुक वरून लग्नपत्रिका हे टाकल्या जात आहेत .

!कारण सोशल मीडियाचा जमाना आहे अनेक लोक हे पुरेपूर सोशल मीडियाचा वापर करतात आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक व्यक्ती ह्या लग्न पत्रिका व्हाट्सअप च्या माध्यमातून नातेवाईकांना पाठवितांना आपल्याला दिसत आहेत .

!परंतु व्हाट्सअप वरून पाठवलेली लग्न पत्रिकेला नातेवाईक मित्रमंडळी कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल !

Leave a Comment