कोरोना चा कालावधीत व गणेशोत्सवात सथानिक लोकांना अडचणी न येऊ म्हणुन माननीय आमदार कार्यसम्राट श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले विविध उपक्रम 

 

 

 

मुंबई प्रतिनिधी (महेश कदम)

 

कोरोना चा कालावधीत व गणेशोत्सवात सथानिक लोकांना अडचणी न येऊ म्हणुन माननीय आमदार कार्यसम्राट श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले विविध उपक्रम

दादर पश्चिम भागातील सेनापती बापट मार्ग, भवानी शंकर रोड, काका साहेब गाडगीळ मार्ग या ठिकाणी पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खडे असल्याने नागरिकांना रहदारी करताना त्रास होत असल्याच्या तक्रारी नुसार खड्डे लवकरात लवकर बुजविण्या साठी स्थानिक आमदार माननीय श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्फत महानगरपालिका
अधिकाऱ्यांकडे केलेल्या मागणीनुसार गणेशोत्सव कालावधीत श्री. गणेश विसर्जन सोहळ्या अगोदर पाठपुरावा करुन सदर मार्गावरील खड्डे महानगरपालिका चे कर्मचारीं कडुन बुजवून घेण्यात आले.

तसेच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रतेक मंडळा मध्ये कोरोना चा वाढत्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन सेनिटायजर वाटप करण्यात आले  अनंत चतुर्दशीला श्री गणेश विसर्जनानिमित्त पोलीस बांधवांसाठी उभारण्यात आलेले दादर कीर्ती कॉलेज तसेच सी-5 माहीम चौपाटी येथील मनोर्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जल-जीव सुरक्षा रक्षकांना मदत करण्याता आले. व परेल भोईवाडा येथे सदाकांत ढवण मैदानात श्री. गणेश मुर्ती विसर्जनासाठी होणारी लोकांची गर्दी पाहता प्रतेक विभागात कृत्रिम तलाव बांधण्यात आले होते.

ह्यात श्री. जितेंद्र कांबळे साहेब यांची विशेष मेहनत असुन त्यांचा सह ॠषिकेश शिखरे, योगेश अहिरे संदीप तिवरेकर, संतोष शिंदे, राजेश जाधव, आदर्श दुबे, शैलेश यादव, विजय डगरे, अजित वैगुडे, संदिप बनसोडे, ज्ञानेश्वर मोरे, पार्थ बावकर यांचे अमुल्य सहकार्य लाभले.

Leave a Comment