कोव्हिड सेंटरमधील वीजप्रवाह खंडित–

 

वैजापूर तालुका प्रतिनिधी-ऋषी जुंधारे

 

वैजापूर दि २१- मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.यात वैजापूर शहर व तालुक्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी उपजिल्हा रुग्णालय व गायकवाड वाडी येथे कोव्हिड केअर सेंटर बसविण्यात आलेले आहे
शनिवारी दि १९/०९/२० रोजी रात्री १०वाजेनंतर गायकवाड वाडी येथील कोव्हिड सेंटरमधील वीजप्रवाह खंडित झाला.रात्रभर लाईट नसल्यामुळे येथील रुग्णांचे खुप हाल झाले आणि त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.परंतु रात्रभर विद्युत पुरवठा सुरू झालाच नाही.
यांस जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या संबंधित कर्मचारी व अभियंत्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक जगताप यांनी उपविभागीय अधिकारी वैजापूर यांना निवेदन देऊन करण्यात आली,तरीही उपस्थित संदीप जगताप शहर संघटक, माणिक गावडे शहर अध्यक्ष,मनोज बोर्डे,रवी धनवटे,नंदू हिरडे,गोरख तुपे

Leave a Comment