खुर्सापार चा संघ विजेता तर पळसगावचा संघ उपविजेता

 

अशोक नगर क्रिडा मंडळ आयोजित खुले कबड्डी सामने

गुड्डू कुरेशी सिंदी  रेल्वे

सिंदी रेल्वे ता.२१ :शहरातील अशोक नगर क्रिडा मंडळाच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खुले कबड्डी स्पर्धेत मंगळवारी (ता.२०)झालेल्या चुरशीच्या अंतीम सामन्यात खुर्सापार येथील सोनामाता क्रिडा मंडळाच्या संघाने विर बजरंग क्रिडा मंडळ पळसगाव (बाई) च्या संघाचा तीन गुणानी पराभव करित.

प्रथम पुरस्कार पटकावित स्पर्धेचा विजयता ठरला.
या संघाला सुधाकर खेडकर यांच्याकडुन प्रथम पुरस्कार म्हणून २५ हजार रुपये रोख आणि मिलिंद बेलखोडे यांच्या कडुन ट्राफी तसेच अमित धाबर्डे कडुन सर्व खेळाडूंना स्पोर्ट्स बॅग देऊन सन्मानित करण्यात आले तर उपविजेता ठरलेल्या विर बजरंग क्रिडा मंडळ पळसगाव संघाला संजय देवळीकर यांचे कडुन द्वितीय पुरस्कार १५ हजार रुपये रोख आणि कोपरकर बंधु कडुन ट्राफी तर अमित धाबर्डे कडुन सर्व खेळाडूंना गेम पॅन्ट देऊन सन्मानित करण्यात आले.

तृतीय पुरस्काराचा मानकरी ठरलेला जय बजरंग क्रिडा मंडळ,निशानघाटच्या संघास सुरज कोपरकर यांच्या कडून ११ हजार रुपये रोख आणि करण गिरडे यांच्या तर्फे ट्राफी व अमित धाबर्डे यांचे कडुन सर्व खेळाडूंना शेकर बाॅटल देऊन सन्मानित करण्यात आले.
बक्षिस वितरण कार्यक्रमाला काग्रेसचे गटनेता आशिष देवतळे,डॉ संदीप खेडकर, अरुण बोंगाडे, सुरज कोपरकर, सुधाकर वाघमारे, राजु कोपरकर, रवी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्यक्तिगत पुरस्कारात उत्कृष्ट चढाई करणारा खेळाडू पळसगाव संघातील समीर भट याला रविद्र कळमकर कडुन मॅट शुज तर उत्कृष्ट पकड करणारा खेळाडू म्हणून पळसगाव संघातील आकाश नखाते याला अशोक नगर बाल गणेश मंडळ तर्फे सिलिंग फॅन तर उत्कृष्ट आॅलरांऊडर खेळाडू म्हणून खुर्सापार संघातील अभिषेक देशमुख याला सागर बाबरे कडुन स्पोर्ट्स अप्पर तर आवडता खेळाडू म्हणून सुद्धा अभिषेक देशमुखला किशोर कोपरकर कडुन मोबाईल गिफ्ट तर अंतीम सामन्यात उत्कृष्ट चढाई करणारा खेळाडू म्हणून म्हणून खुर्सापार संघातील अभिषेक पवार याला पंकज सोरते कडुन गिफ्ट हॅम्पर तर अतिम सामण्यात सुपर चढाई करणारा खेळाडू म्हणून पळसगाव संघातील संकेत आदमने याला नरेंद्र मुटे यांचे कडुन ट्राफी देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन सुरकार यांनी केले. आभार विनोद वरघने यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अशोक नगर क्रिडा मंडळाचे अध्यक्ष निलेश सुरकार, उपाध्यक्ष मयुर कळमकर, सचिव मोहन मुटे, कोषाध्यक्ष हर्षल बडवाईक आदीनी तसेच जगदिश बोरकुटे, विनोद वरघने, सुरेश लाजुरकर, बावने जावई, अजय तलमले, नरेंद्र मुटे, किशोर मदनकर, आदीनी तसेच मंडळाच्या सर्व खेळाडूंनी परिश्रम घेतले

Leave a Comment