गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे येथील पिण्याच्या पाण्यासाठी गावातील नागरिक त्रस्त झाले आहे.

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे पिण्याच्या पाण्यासाठी समस्यांचे निवारण केव्हा करेल. गावातील नागरिक बोलत आहेत की ग्रामपंचायत मध्ये चालले तरी काय कुंभकर्णाची झोप अजून झालीच नाही का नागरिक अशे म्हणत आहे. व तसेच गावातील नळ पाच दिवसांनी सोडण्यात येत असून ते पण अर्धा पाऊण तास सोडण्यात येत आहेत. नळ आल्या नंतर 15 मिनिटे नळाचे पाणी गढूळ येत आहे पिण्यास अयोग्य येत आहे. कारण गावातील सर्व नळाचे वॉल खराब आहेत, वॉल जवळ पाणी साचले आहे. त्यामुळे पाईपलाईन मधून गढूळ पाणी येते. या गढूळ पाण्याने लहान मुलांना तसेच वयोवृद्धाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कित्येक दिवसा पासुन ब्लीचींग पावडर टाकणे बंद आहे. वारंवार सांगून पण सरपंच व सचिव या कडे दुर्लक्ष करीत आहेत. पाच दिवसानी नळ सोडन्यात येत आहेत. गोरगरीब नागरिकांनी येवढी पाण्याची साठवणूक कशी करावी अशा प्रश्न नागरिकांन समोर आलेला आहे. आता पावसाळ्याच्या दिवसांत नळाचे पाणी मिळत नाही असे गावातील नागरिक चर्चेत बोलत आहे. अशा भरपूर गावातील समस्या आहेत तरी शासनाने त्वरित या गावाकडे लक्ष देऊन समस्या दूर कराव्या असे सर्व गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment