शेगाव इस्माईल शेख
अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती *कुणी गुलालात रंगले तर कुणाचे स्वप्न भंगले
शेगाव – तालुक्यातील १० ग्रामपंचायतीचे निकाल दुपारपर्यंत घोषित झाले. यामध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती बघायला मिळाल्या तर काही गावात एकतर्फी निकाल लागल्याचे दिसून आले.
मागील काही दिवसांपासून ग्रा. पं. निवडणुकीने गावा-गावातील राजकारण ढवळून निघाले होते. १८ डिसेंबर रोजी मतदान होवून आज २० डिसेंबर रोजी निकाल घोषित झाले.
शेगाव तालुक्यातील १० ग्रा. पं. च्या मतमोजणीला आज सकाळी १० वा. सुरुवात झाली. येथील वाटिका चौकातील नवीन तहसील कार्यालयात निवडणूक विभागाच्या हॉलमध्ये मतमोजणी झाली.
यावेळी एका पाठोपाठ एका गावाचे निकाल घोषित झाले. यामध्ये काही ठिकाणी चुरशीच्या लढती बघायला मिळाल्या तर काही गावात एकतर्फी उमेदवार विजयी झाले.
विजयी झालेल्या उमेदवारांच्या कार्यकत्यांनी गुलाल उधळत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. बिजयी सरपंच हे आपल्याच पक्षाचे असल्याचा दावा राजकीय पक्षांकडून केल्या जात आहे मात्र विजयी झालेले हे सरपंच नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हे येत्या एक-दोन दिवसात स्पष्ट होईल.
विजयी नवनिर्वाचित सरपंच
खातखेड – शितल रामेश्वर थारकर ४२८, कठोरा – सुषमा जितेंद्र खवले ४४९, येऊलखेड – सदानंद सारंगधर पुंडकर ३८७, लासुरा खु.- योगिता प्रशांत ढोले ४६९, पाडोदी – लता संतोष भरसाखडे ४७७, चिचखेड – मनकर्णा महादेव डुकरे ३१४, कुरखेड – विजय प्रल्हाद धंदर ४९६, तिव्हान खू. – दिपाली अमोल लांजुळकर १७९, माटरगाव खू. – सिध्देश्वर सुखदेव बोंबटकार ३८०, सगोडा – द्वारकाबाई तेजराव बाठे ३५९
यांचा विजय झाला आहे.