गजानन सोनटक्के
जळगाव जामोद
मुलीचे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेलेली विवाहिता मुलीसह गायब झाल्याची घटना जामोद (ता. जळगाव जामोद) येथे समोर आली आहे. मालठाणा (ता. जळगाव जामोद) येथील सौ. राधा अंजूर पवार (22) ही महिला 22 ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास तिच्या पतीसह जामोदला पासपोर्ट फोटो काढण्यासाठी व दळणाकरिता आले होते. तिचा पती दळण दळण्यासाठी गेला व राधा मुलीसह फोटो काढण्यासाठी गेली. त्यानंतर ती गायब झाल्याचे तिच्या पतीचे म्हणणे आहे. पूर्ण गावात तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मुलीसह ती हरविल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.