Home Breaking News चान्नी येथील दिव्याग लाभार्थ्यांना पाच टक्के निधी देण्यात टाळा टाळ !

चान्नी येथील दिव्याग लाभार्थ्यांना पाच टक्के निधी देण्यात टाळा टाळ !

286
0

 

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाची पायमल्ली संबधीताचे दुर्लक्ष

नासिर शहा
पातू प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील चान्नी येथे दिव्यागाणा पाच टक्के निधी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप दिव्याग लाभार्थ्यांना कडून होत आहे.
पाच टक्के निधी मिळवण्यासाठी दिव्याग्या लाभार्थ्यांनी संबंधित वरिष्ठ ग्रामपंचायत कडे निवेदन दिले परंतू संबधीताकडून तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दिव्याग्य लाभार्थ्यांना उपास मारीची वेळ आली आहे.
ग्रामपंचायत मध्ये अनेक वेळा निधी जमा झाला परंतु लाभार्थ्यांना त्यांच्या दरकाचे पाच टक्के निधी देण्याची तरतूद देखील ग्रामपंचायत कडून करण्यात आली नाही.जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नगर पालीका स्तरावर दिव्यागाचा पाच टक्के राखीव निधी खर्च करण्यात अलटिमेट पालकमंत्री बच्चु कडू भाऊ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्ह्यातील गट विकास अधिकारी यांना दिले होते. गेल्या जुलै महीन्या मध्ये जिल्हा अधिकारी कार्यालया सभागृहात एका बैठकीत दिव्याग लाभार्थ्यांयांच्या पाच टक्के निधी पंधरा दिवसात देण्यात यावा अश्या संबंधीतावर निलबताची कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देखील पालकमंत्री यांनी दिला.
परंतु चान्नी येथील दिव्याग लाभार्थ्यांना पाच टक्के पालकमंत्री बच्चु भाऊ कडू यांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.पालकमंत्री बच्चु भाऊ कडू जिल्ह्यातील गोर गरीबाची आक्रमण मुमीका घेऊन संबंधित अधीकाऱ्यांना निदेश देतात परंतु त्यांच्या आदेशाची पायमल्ली करून येत आहे.त्यामुळे चान्नी येथील दिव्यागाचे नाराजीचे सुर उमटत आहे.तसेच पालकमंत्री बच्चु भाऊन कडून दिव्यांग जनतेला खुप अपेक्षा आहे.त्यांनी या गंभीर बाबी कडे तज्ञ देऊन दिव्यागाणा त्यांच्या हक्काचा निधी मिळऊन देण्यासाठी संबंधीताना आदेश दयावे

Previous articleपोलिस अधीक्षकांच्या पथकाची जूगार अड्यावर धाड
Next articleजळगाव ते जामोद रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here