चुन भाकर आंदोलनाने तहसिल कार्यालय दणाणले

 

संग्रामपुर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात सरसकट शासनाने अनुदान द्यावे या मांगणी करीता शेतकर्यांना सोबत घेवुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शासन विरोधी घोषणा देत महाआघाडीच्या शासनाचे निषेध व्यक्त केला. तालुक्यात शेतकर्‍यांची परिस्थिती भयानक असतांना सुध्दा हे सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. मुंग, उडीद, सोयाबीन, कापूस ही सर्व पिके बाद झाली आहे. अस असताना शेतकरी मोठय़ा आशेने शासनाकडे पाहत होते पंरतु निराशाच हाती आली. या सर्व बाबींचा विचार करत भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी शेतकऱ्यांच्या सेमवेत भाकर चटणी खात या शासनाचे विरोध केले.
यावेळी श्री लोकेश राठी, तालुका अध्यक्ष भाजपा, पं स सभापती सौ नंदाताई पांडुरंगजी हागे,गजाननभाऊ दाणे, सभापती कृ उ बा समिती, जानरावजी देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, राजुभाऊ ठाकरे, सहकार जिल्हा संयोजक, पांडुरंगजी हागे, डॉ. गणेशभाऊ दातिर, जिल्हा सदस्य भाजपा, ज्ञानदेवराव भारसाकळे, जि प सदस्य, प्रमोदभाऊ खोद्रे, जि प सदस्य, श्री अंबादासजी चव्हाण, उपसभापती, पं स संग्रामपुर, विलासभाऊ इंगळे, शहराध्यक्ष संग्रामपुर, सुभाषभाऊ हागे, प्रमोदभाऊ गोसावी, रामदास म्हसाळ, अविनाश धर्माळ, राजुभाऊ मुयांडे, श्रीकृष्ण भालतिडक, संजुभाऊ ठाकरे, गुणवंता खोडके, नारायण अवचार, संजुभाऊ उमाळे, शामभाऊ आकोटकार, यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ता उपस्थित होते

Leave a Comment