Home Breaking News छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख थांबवा- तहसीलदारांना निवेदन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख थांबवा- तहसीलदारांना निवेदन

307
0

नांदुरा ( प्रफुल्ल बिचारे पाटिल) :-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात जन्माला आल्याने सर्व जण स्वतःला भाग्यवंत समजतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेले कष्ट,त्यांचे पराक्रम, त्याग, ध्येय याला तोड नाही. अशा महापुरुषांच्या नावाने नांदुरा शहरातील एका चौकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे व त्याठिकाणी सुंदर देखावा निर्माण केला आहे. मात्र त्या चौकाला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा उल्लेख काही सुशिक्षित, प्रतिष्ठित दुकानदार आपल्या दुकानाच्या शापील जाहिराती, होल्डिंग, कॅरी बॅग व थैली वर एकेरी उल्लेख शिवाजी चौक कसा करतात. अशा महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणे योग्य नाही त्यामुळे तमाम शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या जात आहे.
म्हणून तहसीलदार हे तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे बाबीकडे लक्ष देऊन संबंधित दुकानदार यांना करत असलेली चूक लक्षात आणून देऊन एकेरी नावाचा उल्लेख त्यांनी करू नये यासाठी आपण आपल्या स्तरावरुन कारवाई करावी यासाठी नांदुरा शहरातील तमाम शिवसैनिक व भीमसैनिक यांच्यावतीने तहसीलदार नांदुरा यांना निवेदन देण्यात आले आहे. असा एकेरी नावाचा उल्लेख पुन्हा त्यांच्या कडून झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कुणाल वाकोडे,अर्जुन वाकोडे, गणेश पानझाडे, शुभम भिडे, हरिओम ताटे, प्रेम भामन्द्रे, विशाल बगन, देवा वाकडे,सुरज राखोंडे, धम्मा वाकोडे, पंकज गवई , रोहित पहुरकर, गौरव सातरोटे, अभिजित वाकोडे,राष्ट्रपाल सपकाळ,मुकेश,सागर सूर्यवंशी वाकोडे इत्यादी भरपूर लोक उपस्थित होते.

Previous articleउद्या ठरणार सूनगाव ग्रामपंचायत चा कारभारी (सरपंच)
Next articleएअरटेल -आयडिया नेटवर्क समस्येमुळे अनेक कामे खोळंबली !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here