जनावरावरील लम्पी स्कीन रोगाबाबत सतर्कता राखा

 

 

ग्रामीण भागात जनावरावरील लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याबाबत मेडशी व आजूबाजूच्या खेड्यातील पशुपालकांनी सतर्कता बाळगून जनावरावर उपचार करावे असे आव्हान पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांनी केले आहे.लम्पी आजार विषाणूजन्य आहे अत्यंत संसर्गजन्य आजार विषाणू गटातील टपरी पाक्ष प्रवर्ग आहे. या रोगाचा प्रकार हा चावणाऱ्या माशा,डास,गोचीड,चिकटे व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने किंवा दूषित चारा व पाण्यामुळे होतो या रोगाची लक्षणे ही अंगावर गाठी येणे सुरुवातीला ताप येणे डोळे नाकातून चिकटस्त्राव किंवा चारापाणी न खाने दूध उत्पादनात कमी होणे जनावराच्या पायावर सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात.लम्पि स्किन रोगावर नियंत्रणासाठी गोट्यामध्ये डास माशा गोचीड होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे तेव्हा हा साथीचा आजार असून हा आजार सुरू असल्यामुळे बाजारातून जनावराची खरेदी विक्री थांबवावी याबाबत याबाबत रोगावर नियंत्रणासाठी रोगावर नियंत्रणासाठी बाधित जनावरे तात्काळ वेगळे करावे गोठ्यामध्ये सोडियम हायक्लोराईड व फिनाईलची फवारणी करावी जनावरांना तीन इंजेक्शन दिल्यास कीटक गोचीड यांची नियंत्रण होते गावामध्ये कीटकनाशक औषधी फवारणी करावी या रोगाच्या नियंत्रणासाठी तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये घेऊन जावे याबाबतचे आव्हान विस्तार अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांनी केले आहे मेडशी परिसरातील आजूबाजूच्या खेड्यातील पशुधन पालकांनी आपल्या जनावरांमध्ये लक्षण दिसून आल्यास पशुवैद्यकीय अधिकारी मेडशी यांना कळवावे.

*ग्रामपंचायत कडून जनावराच्या कोठ्यात लवकर कीटकनाशक फवारणी करावी व पशसंवर्धन विभागाने लसीकरण करावे जेणे करून जनावरांना बाधा होणार नाही*

Leave a Comment