Home बुलढाणा जळगांव (जा ) – 32 वे उपवर माळी युवक युवती परिचय संमेलन...

जळगांव (जा ) – 32 वे उपवर माळी युवक युवती परिचय संमेलन 3 जानेवारी 2021ला. जळगांव (जामोद) व संग्रामपुर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळ जळगांव यांच्या वतीने उपवर युवक युवती परिचय संमेलन संदर्भात

322
0

 

सुरेश गोंड जळगाव जामोद शहर प्रतिनिधी

कृष्णरावजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र जळगांव जामोद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध विषयांवर चर्चा करून, सदर बैठकीत परिचय संमेलन रविवार दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी कृषी विज्ञान केंद्र जळगांव ( जा) येथे घेण्याचे ठरविले.
मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले मंडळ जळगांव जामोद यांच्या माध्यमातून उपवर युवक युवती परिचय मेळावा, सामुहिक विवाह सोहळा ह्यांची सर्वप्रथम मुहूर्तमेळ महाराष्ट्रात रोवली. मंडळाच्या या वर्षीच्या विविध कार्यक्रमासाठी सर्वानुमते
अध्यक्ष:- मारोती वानखडे(खेर्डा)
कार्याध्यक्ष:- पांडुरंग वेरुळकर(सोनाळा)
सचिव:- मुकुंद दाते (वडशिंगी),
उपाध्यक्ष:-विश्वंबर वावगे(धोनोरा) व सुनिल तायडे(पातुर्डा) कोषाध्यक्ष:-गोपाल इंगळे(लाडणापूर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपवर युवक युवती परिचय सम्मेलन नोंदणीची अंतिम तारीख दि. 8 डिसेंबर 2020 ठरविण्यात आली. सदर बैठकीला
प्रा.हरिभाऊ इंगळे
डॉ. सौ.स्वातीताई वाकेकर,
अभिमन्यू राखोडे, वासुदेवराव भोपळे,
महादेवराव घुटे,
प्रवीण भोपळे, डॉ.संदीप वाकेकर, त्र्यंबकराव घाटे, राजीव घुटे, रामकृष्ण खिरोडकर, अँड.रतन इंगळे, गजानन बोदडे, रामदास राऊत, शालीग्राम भोपळे, समाधान खिरोडकर,पांडुरंग भोपळे, शांताराम म्हसाळ, नीलकंठ उमाळे,अरुण वानखडे, दीपक उमाळे, पंकज तायडे, गणेश भड,दीपक उमाळे, विजय म्हसाळ, डॉ.राखोंडे, नितीन जाधव, वैभव धर्माळ, अनिल इंगळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते
प्रस्ताविक नितीनभाऊ सातव यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव राजनकार यांनी केले

Previous articleक्रांती क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने खेळाडूंना साहित्य वाटप
Next articleगोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानासमोरील झाडांची कत्तल, अज्ञाताविरुद्ध वनविभागाने नोंदविला गुन्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here