जळगाव जामोद तहसील कार्यालया समोर बेसन भाकर खात केले भाजपाने आंदोलन… व काळी दिवाळी साजरी

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा. तालुका प्रतिनिधी:-

आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद तालुका भाजपाच्या वतीने शेतकऱ्यांना शासकीय मदत ताबडतोब देण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयासमोर बेसन भाकर आंदोलन करण्यात आले, संपूर्ण जिल्ह्यात ओल्या दुष्काळाने थैमान घातले आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातील पीक नुकसान झाले आहे, जळगाव जामोद तालुक्यात ही सर्वात जास्त पिकाचे नुकसान झाले आहे , सोयाबीन पिकाचे तर सांगायलाच नको सोंगणी ही महागात पडत आहे. कपाशी वर ही बोंड अळी येऊन मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशातच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.
पण राजकीय दाबावा खाली येऊन पिकाची अनेवारी ही ५० टक्या पेक्षा जास्त दाखवण्यात आली आहे, पालकमंत्र्यांच्या मतदार संघात सर्वाधिक नुकसान दाखवण्यात आले आणि तेच जळगाव जामोद मतदार संघात सर्वात कमी नुकसान झाले असा अहवाल पाठवण्यात आला..
जिल्ह्यात ६५ हजार शेतकरी नुकसान भरपाई साठी पात्र आहेत त्यात एकट्या सिंदखेड राजा मध्ये ५९ हजार शेतकरी नुकसान ग्रस्त दाखवले म्हणजे हा सरसर अन्याय भेदभाव आहे शेतकऱ्या सोबत त्याच करिता पिकाची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी भाजपा जळगाव जामोद येथे बेसनभाकर खात आंदोलन करण्यात आले , दिवाळी सारखा मोठा सण उद्या आहे पण शेतकऱ्यांचा पिकाच नुकसान झालं त्यात त्यांना भेदभाव करून मदत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यानी कशी दिवाळी साजरी करायची , कपडे लात्ते तर दूर त्यांना खायची वांदे झाले हे पालकमंत्र्यांना दिसत नाही काय ?
असा प्रश्न या वेळी विचारण्यात आला … शेतकऱ्यांचा सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आज बेसन भाकर आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला… शेतकऱ्या सोबत बेसन भाकर खाऊन आंदोलन केले , व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व बेसन भाकर दिली , सोबत च मागण्या पूर्ण न झाल्यास या पेक्षा ही उग्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ,, शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र गांधी , भाजपा ओबीसी अध्यक्ष रवींद्र ढोकणे, भाजयूमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, नगराध्यक्ष सौ. सीमाताई डोबे , सौ. अपर्णाताई संजय कुटे , चंदाताई पुंडे , लताताई तायडे , जिल्हा महा मंत्री नंदू अग्रवाल नगरसेवक निलेश शर्मा , रवी पाचपोर , चंद्रकांत वाघ , जी प सदस्य रुपालीताई अशोक काळपांडे , राजेंद्र उमाळे, बंडू भाऊ पाटील ,पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, मोहनसिंह राजपुत,रमेश वंडाळे, अमोल घाटे , राम इंगळे , ज्ञानेश्वर तिकर , गणेश वाघ , परम राजपूत यांच्यासह शेकडो भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Comment