प्रतिनिधी -सचिन पगारे मो.न८३२९४२९२२१
नांदगाव (नाशिक)
जागतिक मृदादिनाच्या निमित्ताने जातेगांव येथे कृषी विभागा मार्फत शिबीराचे आयोजन करण्यात आले. नांदगांवचे कृषी सहायक श्री. अविनाश पुराणे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमी दुर्लक्षित राहिलेला घटक . संपूर्ण जीवसृष्टीसाठी माती ही महत्त्वपूर्ण समजली जाते. अन्नधान्याच्या ९० टक्के गरजा ह्या मातीमुळेच पूर्ण होतात.जर मातीची धूप झाली तर जमिनीतील लाखो टन अन्नद्रव्य ,जीवाणू व बुरशीचा नाश होतो. माती संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या खाद्य व कृषी संस्थेने ५ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक मृदादिन ‘ साजरी करण्याचे ठरविले. नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे गावातील श्री पिनाकेश्वर महादेव मंदिरात कृषी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जागतिक मृदादिनाचे औचित्य साधून नांदगांव येथील कृषी विभागाचे कृषी सहायक श्री. अविनाश पुराणे यांनी या शिबीराचे आयोजन केले. श्री. पुराणे यांनी शेतकर्यांना मातीचे महत्त्व, मातीतील आवश्यक घटक, मातीतील पोषक घटकांसाठी उपाय योजना, गावनिहाय सूक्ष्म मूलद्रव्ये प्रमाण, खत व्यवस्थापन ,गावाचा सूपिकता निर्देशांक आदी विषयांवर मार्गदर्शन करून शेतकर्यांशी संवाद साधला व राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत जमिन आरोग्य पत्रिकेचे वितरण केले . या ठिकाणी श्री. विजय पाटील , रावसाहेब खिरडकर, संदिप पवार,आंबादास सोनवणे, तातेराव पगारे, कारभारी खिरडकर, दिलीप सोनवणे, वैभव शिंदे, ईश्वर जाधव,कैलास पवार, कैलास गायकवाड, दादासाहेब सोनवणे, आंबादास रवळे ,छबुजी लाठे, आदी शेतकरी उपस्थित होते .