जातेगांव येथे क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी

 

सचिन पगारे नांदगाव नाशिक

क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त जातेगांव येथे महात्मा फुले यांच्या पूतळ्यास प्रहार शेतकरी संघटना शाखा कार्यकर्ते व उपस्थित ग्रामस्थांकडून अभिवादन करण्यात आले.
नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले यांच्या पूतळ्यास विनम्र अभिवादन करण्यासाठी विविध मान्यवर उपस्थित होते . प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष श्री.संदिप सूर्यवंशी यांनी पूतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. तालूका यूवासेना प्रमुख गुलाब चव्हाण, अनिल पवार आदींनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याठिकाणी प्रहार शेतकरी संघटना शाखा अध्यक्ष जनार्दन भागवत, उपाध्यक्ष चंद्रभान झोडगे,संघटक ईश्वर जाधव, सचिव सचिन पगारे, गणेश जुंधरे, वाल्मिक वर्पे, सतिश भागवत, रविकांत भागवत, निवृत्ती सोनवणे,जयराम सोनवणे,बाळु चव्हाण, नवनाथ पवार, सोमनाथ पवार,राहूल पवार,गणेश सोनवणे,नंदू खिरडकर आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते .

 

Leave a Comment