जामोद ग्रामपंचायत सरपंचावर दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव नामंजूर…

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगांव जामोद प्रतिनिधी:-

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी जामोद ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच सौ गंगुबाई पुंडलिक दामदर यांच्यावर 22 तारखेला तालुका निवडणूक अधिकारी यांच्याकडे 13 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्यानुसार आज दिनांक 27 ऑक्टोबर ला प्रस्तावावर सभा बोलविण्यात आली होती ,तालुका निवडणूक निर्णय अधिकारी सह त्यांचे सहकारी जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुनील जाधव साहेब व त्यांचे सहकारी जातीने हजर होते यावेळेस सभागृहांमध्ये प्रस्ताव दाखल करणारे 13 सदस्य सभागृहात हजर होते सरपंचाच्या बाजूचे चार सदस्य गैरहजर होते तेरापैकी एक सदस्य फुटल्याने अविश्वास प्रस्ताव बारगळला आज योगायोगाने जामोद नगरीमध्ये दुर्गा विसर्जन होते आणि त्यातच सरपंच विसर्जन होता होता थोडक्यात वाचले.

Leave a Comment