Home कृषिसंपदा जामोद महसूल मंडळातील संत्रा पिकाच्या विम्यापासून व कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनसाठी...

जामोद महसूल मंडळातील संत्रा पिकाच्या विम्यापासून व कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनसाठी लढा उभारणाऱ्याची गरज- प्रशांत डिक्कर…

356
0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव सन 2019 _20 मध्ये जळगाव जामोद तालुक्यातील जामोद मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा पिकाचा विमा काढलेला होता परंतु त्यांना या विम्याचा परतावा म्हणून विमा रक्कम मिळालेली नाही याउलट जळगाव जामोद तालुक्यात लगतच असलेल्या संग्रामपूर मध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 58 हजार रुपये विमा मिळालेला आहे, जामोद मंडळातील संत्रा उत्पादकांचे संत्रा पिकाची नुकसान झालेले असून सुद्धा त्यांना विमा कंपनीने कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नव्हती ही बाब मंडळातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनीधी, तहसीलदार उपविभागीय अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली परंतु आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे ही कैफियत शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्याकडे कथन केली. दि. 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सुनगाव येथील बालाजी मंदिरात शेतकऱ्यांनी प्रशांत डिक्कर यांच्याशी संत्रा पिकविमा प्रश्नावर व कर्ज माफि पासुन वंचित असलेल्या प्रश्नावर चर्चा केली प्रशांत डिक्कर यांनी या वेळी शेतकऱ्यांच्या संत्रा पीक विम्याच्या अडचणीवर न्यायालयीन पर्याय शोधता येईल व कर्ज माफिसाठी लवकरच लढा उभा करुण शेतक-यांना न्याय मिळवुन देणार असे आश्वासन या वेळी दिले या कार्यक्रमाच्या वेळी पंचायत समितीचे उपसभापती श्री महादेवराव धुर्डे यांनी श्री प्रशांत डिक्कर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, शेतक-यानसाठी लढाउ व्यक्तिमत्तव म्हणुन प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी शेतक-यांनी शेतकरी हिताच्या लढ्यसाठी उभे राहणे गरजेचे आहे. या बैठकित रामकृष्ण काळपांडे ,मंगेश धुर्डे, बळीराम धुळे, गजानन कपले, वसंत काळपांडे, सुरेश काळपांडे, वसंता वंडाळे ,सौ यशोदा काळपांडे ,तुळसाबाई धुर्डे, शांताबाई मिसाळ, विजय वंडाळे, आत्माराम अबडकार,गणेश वसूले, रमेश अबडकार ,पांडुरंग अबडकार ,निनाजी मिसाळ रमेश वंडाळे, श्रीराम राऊत ,वसंता धुळे वसंत ढगे, गजानन वंडाळे व इतर संत्रा उत्पादक शेतकरी हजर होते.

Previous articleवाडेगांव जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप
Next articleसमता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना.छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद येथे भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here