जालना जिल्ह्यासह तालुक्यामध्ये सोयाबीन काढण्याची लगबग सुरू:

 

प्रतिनिधी:(जालना)जालना जिल्ह्यासह तालुक्यामध्ये सोयाबीन काढण्याची लगबग सुरू झाली आहे.एक-एकर मागे साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति बॅग मजूर घेत आहे. मागील एक-दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.या वादळी वाऱ्यामुळे कपाशीचे फार मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे हाता-तोंडाशी आलेल्या घास निसर्गाने हिरावून घेऊ नये,यासाठी शेतकरी वाटेल त्या भावाने मजुराला सोयाबीन कापणीला देत आहे.आज रोजी जालना मार्केट मध्ये सोयाबीन चार हजार ते चार हजार पाचशे क्विंटल जात आहे.त्यामुळे शेतकरी घाई-गडबडीने सोयाबीन कापणी करून मंळीयंतरातुन सोयाबीन काढुन घेत आहे.त्यामुळे शासनाने सोयाबीनला चांगल्या प्रकारे भाव द्यावा अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गाकडून होत आहे. तसेच दिवसेंदिवस महागाई वाढल्यामुळे मजुराला तीनशे ते पाचशे रुपये रोजंदारी द्यावी लागते.तसेच बी बियाणे रासायनिक खते यांची सुद्धा भरमसाठ वाढ झाली असल्यामुळे शेतकऱ्याच्या हाती माल विकूनही पैसा टिकत नाही.यातच दवाखाना,घर खर्च,मुला-मुलींची शैक्षणिक खर्च या सगळ्या गोष्टींचा शेतकऱ्यांना सरासर विचार करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे व रासायनिक खताचे भाव कमी झाली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्ग आपली भावना व्यक्त करीत आहे.

प्रतिनिधी-तुकाराम राठोड,जालना

Leave a Comment