जालना शहरातील वाल्मीक नगर येथे दोन गटात तुंबळ हाणामारी दहा जन गंभीर जखमी:

 

प्रतिनिधी:(जालना)शहरातील वाल्मीक नगर येथे दि.28 डिसेंबर 2022 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने 10 जन गंभीर जखमी झाले आहेत.या सर्वा जनावय जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाल्मीक नगर येथे शेजारीच राहणार्‍या दोन कुटुंबात ही हाणामारी झाली असून,या घटनेत दोन्ही गटातील लोक जखमी आहेत.एका गटातील 7 जन जखमी आहेत.या जखमीमध्ये मध्ये 3 महिलांचाही समावेश आहे.यामध्ये नंदुसिंग राजपुत,देवा राजपुत,जित्तु राजपुत,जोमाबाई राजपुत,उमाबाई राजपुत,बायाबाई राजपुत,आदेश राजपुत अशी जखमींची नावे आहेत.तर दुसर्‍या गटातील 3 जन जखमी आहे.यामध्ये कलीम शेख शरीफ,अमजद शेख शम्मू,शेख सलमान शेख तमीज यांचा समावेश आहे.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु,सदरबाजार पोलीस ठाण्याचे स.पो.नि.ज्ञानेश्वर पायघन,चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पो.नि.नाचण यांच्यासह पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.सध्या घटनास्थळी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment