जिथे जातीपातीचा अंत नाही ते राष्ट्र होऊ शकत नाही – – बिग्रेडिअर मा . खा . सुधीर सावंत !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कूलमध्ये माजी अर्जुन गवई यांनी दहा क्विंटल अन्नदान वाटप केले !राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जयंती निमित्तानेअनिकेत सैनिक स्कूल मध्ये आज 12 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अन्न वाटपाचे आयोजन करण्यात आले होते !यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मार्गदर्शक ‘माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंतसाखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे ‘कर्नल श्री रानडे ‘माजी सैनिक फेडरेशनची कार्याध्यक्ष कर्नल श्रीअंकुशे ‘माजी सैनिक फेडरेशनचे प्रवक्ते श्री निंबाळकर सर ‘महिला बचत गटाची जिल्हा समन्वयक श्री तायडे साहेब ‘सह नियंत्रण अधिकारी ‘श्री कुंदन सदाशिव ‘माहिमचे अधिकारी .महेश पाटील ‘आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते श्री मुरलीधर गवई ‘शिंदी गावचे सरपंच विनोद खरात .अनिकेत सैनिक स्कूल चे संचालक महादू गवई श्री बनसोड सर .श्री बंगाळे ताई .लोकमतचे पत्रकार अशोक इंगळे दिव्य मराठीचे संतोष गाडेकर ‘बागातदार निवृत्ती खरात ‘कवी रामदास कोरडे पत्रकार सचिन खंडारे आदी उपस्थित होते ‘यावेळी सर्वप्रथम बिग्रेडिअर सुधीर सावंत व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले !यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात मधून अनिकेत सैनिक स्कूल चे सर्वेसर्वा .अर्जुन गवई यांनी आपल्या कार्याचा आढावा सांगितला ‘यानंतर आपल्या समारोपीय भाषणामध्ये बिग्रेडीअर सुधीर सावंत यांनी सांगितले की बाबासाहेबांनी जे संविधान दिले आहेत या मार्गाने आपण चालले पाहिजे राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब . छत्रपती शिवाजी महाराज यांनी कारभार चालवला .तसा कार्यभार चालायला हवा ‘तसेच ज्या देशांमध्ये जातीपातीचा अंत नाही ते राष्ट्र होऊ शकत नाही जात पात हे मिटायला हवे ! व ग्रामीण भागामध्ये अर्जुन गवई यांनी देशसेवेचा जो वसा घेतला आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले !यानंतर अन्नदान वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना अन्नदान बिग्रेडिअर सुधीरजी सावंत यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले !कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत सैनिक स्कूल चे सर्वेसर्वा माननीय अर्जुन गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य श्री जाधव यांनी केले !कार्यक्रम यशस्वी ते साठी श्री शिंदे सर श्री पटेल ‘अंभोरे यांनी परिश्रम घेतले यावेळी शिंदी व परिसरातील सर्व माजी सैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या !

Leave a Comment