जिल्हाध्यक्षपदी गजानन खंडाळे यांची नियुक्ती

 

मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
सिंदी रेल्वे ता.२० : शहरातील सुप्रसिद्ध समाजसेवक तथा काग्रेस कार्यकर्ते गजानन खंडाळे यांची मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे आणि महासचिव विजय सोनोने यांनी सर्वानुमते गजानन खंडाळे यांची निवड केली.

आपल्या निवडीबद्दल गजानन खंडाळे यांनी मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. असुन आपण समाजाच्या उत्थानासाठी स्वतःला यापुढे वाहुन घेऊ असे आश्वस्त केले.

सिंदी रेल्वे सारख्या छोट्या शहरातुन जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या गजानन खंडाळे यांचे सर्व स्तरातून तसेच मातंग समाज बांधवा कडुन अभिनंदन होत आहे.

Leave a Comment