जिल्हा परिषद शाळा पाळा शिक्षण मिळण्याकरिता शाळा बंद आंदोलन व पालकांचे साखळी उपोषण सुरू

 

खामगांव – राजेंद्र मुंडे

खामगाव तालुक्यातील पाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग एक ते सात असून एकूण विद्यार्थी संख्या 136 असून कार्यरत शिक्षक मात्र तीनच आहेत गेल्या एका वर्षापासून पंचायत समिती गट विकास अधिकारी राजपूत साहेब, गट शिक्षण अधिकारी श्री गायकवाड साहेब, तसेच जिल्हा परिषद चे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी सी पागोरे साहेब यांच्याकडे वेळोवेळी शिक्षक मागणीचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य तसेच पालकांनी वेळोवेळी निवेदन सादर करून व बिंदु नामावली नुसार पोर्टल लाही तक्रार देऊन अद्यापही एकही शिक्षक मिळाला नाही तरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व सर्व विद्यार्थी पालक यांनी शाळा बंद आंदोलन व गावकरी यांनी आज शाळा बहिष्कार व बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे बंद आंदोलन व साखळी उपोषण चालू असताना जर यामध्ये काही नुकसान झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर असेल

Leave a Comment