जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चान्नी येथे शेतकऱ्यांना पीक कर्ज कसे घ्यावे याबाबत देण्यात आली माहिती

0
288

 

योगेश नागोलकार

राहेर/डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय, शिर्ला (अंधारे) येथील विद्यार्थिनी आदित्य नप्ते व कलेश्वर नप्ते यानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ,अकोला शाखा-चान्नी येथे शेतकऱ्यासोबत जाऊन पीक कर्ज बाबत पीक कर्ज कसे घ्यावे यासाठी मदत केली. शेतकऱ्याला पीक पेरणीपासून काढणीपर्यंत भरपूर खर्च लागतो. तो भागवण्यासाठी सर्वच शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. त्यांना पीककर्जाची साथ असते. मोठा आर्थिक आधार असतो. याच साठी पीक कर्जा साठी माहिती घेत असताना बँक व्यवस्थापक व तेथील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. तसेच पीक कर्ज ची माहिती घेण्यासाठी मळसुर गावातील शेतकरी उपस्थित होते. श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. खरडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. टी. कव्हर, कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. ए. देशमुख, विषयतज्ञ प्रा. के. एम. वानखडे पीककर्जाची माहिती घेण्यासाठी यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here